जिनपिंग, पुतीन यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याशी त्रिपक्षीय बैठकीत हवामान बदल आणि दहशतवादाच्या मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेत तिन्ही देशांनी दहशतवादाविरोधात एकत्रीत लढण्याची तयारी दर्शवली.

यावेळी मोदींनी म्हणाले, सध्या जगासमोर असलेल्या सर्व समस्यांचे समाधान शोधण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल. जगातील तीन महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था असल्याच्या कारणाने आपल्यातील विचारांची देवान-घेवान आणि अर्थव्यवस्थांना बळकटी आणण्यासाठी महत्वाची मुद्दे हे चर्चेतून समोर येतील.

यावेळी मोदींनी फेब्रुवारीमध्ये चीन येथील दौऱ्यात जिनपिंग यांच्याशी दहशतवादाच्या मुद्याला धरुन झालेल्या चर्चेची आठवन करुन देत त्या संदर्भात लवकरात लवकर पाऊले उचलने गरजेचे असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.