गटबाजी रोखण्यासाठी भाजप नगरसेवकांशी चर्चा

सांगली : महानगर पालिकेच्या महापौर, उपमहापौर पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी सांगलीत झाली. गटबाजी रोखण्यासाठी भाजप नगरसेवकांशी चर्चा करून कोअर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली.

या बैठकीस भाजपच्या सर्व नागरसेवक, कार्यकर्त्यांना निमंत्रित केले होते. या बैठकीत इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात आली. उपमहापौर पदासाठी राजेंद्र कुंभार, आनंदा देवमाने, प्रकाश ढंग, जगन्नाथ ठोकळे इच्छुक आहेत.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर, महापालिकेचे गटनेते युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.