लसीकरणाच्या ‘पुणे पॅटर्न’ची चर्चा

आरोग्य यंत्रणेकडून नियमांची नियोजनबद्ध अंमलबजावणी

पुणे – लसीकरण केंद्रावर कोणती लस दिली जाते, त्याचा उपलब्ध साठा यासह विविध दहा नियमांच्या अंमलबजावणीमुळे लसीकरण सुरळीत होत आहे. लसीकरणाला गती मिळाली असून, लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होत असल्यामुळे हा “पुणे पॅटर्न’ची चर्चा आता आरोग्य खात्यात सुरू झाली असून, त्याचे स्वागत होऊ लागले आहे.

पुणे शहर, जिल्ह्यात सध्या लसीकरण सुरु आहे. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण सुरुळीत व्हावे यासाठी काही नियमांची आखणी करण्यात आली आहे. त्याची सध्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व खासगी रुग्णालये व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा उप रुग्णालयांमध्ये “इ-विन’ आणि “कोव्हिन’चे यूजर आयडी, पासवर्ड उपलब्ध असल्याची खात्री करावी. प्रत्येक करोना लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी “इ व्हिन’ आणि “को-विन’चे एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावेत.

दोन्ही पोर्टलमध्ये माहिती भरण्याची तसेच जिल्हास्तरावर रोज सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत कळविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात यावी. त्यासोबत कार्यक्षेत्रातील सर्व खासगी संस्थांचे आकडेवारी घेणे व जिल्हास्तरावर कळविण्याची जबाबदारी द्यावी, असे नियम करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा आरोग्य समितीचे कार्याध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिली.

… असे होते कामकाज
मोठ्या रुग्णालयातील दोन वेगवेगळ्या खोलीबाहेर कोव्हॅक्‍सिन आणि कोव्हिशिल्ड लसीकरण असा उल्लेख असलेले फलक लावावे. सर्व संस्थांना आता 24 तास लसीकरणास परवानगी आहे, परंतु आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये साधारण सायंकाळी सहापर्यंत लसीकरण करण्यात येईल. लसींचा उपलब्ध साठा त्याच दिवशी संपवावा. पुढील तीन दिवस लागणारी लसीची मागणी 24 तासांपूर्वी करणे आवश्‍यक आहे. मागणी केल्यानुसार 24 तासानंतर दुसऱ्या दिवशी तालुक्‍यातून एक गाडी जिल्हा लससाठा केंद्राकडे पाठविणे आवश्‍यक आहे. यानुसार लसीकरण करण्यासाठीचे नियम कार्यान्वित करण्यात आले आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यासाठी काही नियमावली निश्‍चित केली आहे. त्यानुसार लसीकरण सुरू असून ते सुरळीत आणि वेगाने होत आहे. त्याकरिता लसीकरणाचा पुणे पॅटर्न हा विकसित होत आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.