बॉलीवूडमधील अभिनेत्रींचे एकाहून एक सुंदर ड्रेस नेहमीच सर्वसामान्यांसाठी चर्चेचा विषय असतात. सध्या सारा अली खानच्या अशाच एका ड्रेसची चर्चा सुरू आहे. रोमानियाच्या ड्रेस डिझायनरने तयार केलेल्या या ब्ल्यू टर्कोएस ड्रेसमध्ये सारा एकदम फंकी लूकमध्ये दिसत आहे.
या ड्रेसच्या निर्मितीबरोबरच त्याच्या किमतीचीही जोरदार चर्चा होत आहे. सध्या सारा “लव आजकल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे.
यादरम्यान ती हा ब्ल्यू ड्रेस, ब्ल्यू वॉच आणि ब्ल्यू हिल्स घालून चाहत्यांसमोर आली तेव्हा सर्वांनीच तिचे कौतुक केले. पण या ड्रेसच्या किमतीमध्ये एखाद्या हिलस्टेशनची पिकनिक होऊ शकेल असेसांगितले जात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा ड्रेस जवळपास 45 हजार रुपयांचा आहे.
“लव्ह आज कल’बरोबरच सारा “कुली नं 1′ च्या रिमेकमध्येही झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार असून चित्रपटात वरुण धवनसह अक्षयकुमार आणि धनुष यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.