– प्रितम पुरोहित
भोर (प्रतीनिधी) – येथील प्रसूती महिला आणि तिच्या बाळाला वाचविण्यात उपजिल्हा रुग्णालय अर्थात सरकारी रुग्णालयाला यश आले आहे. महिलेची प्रसुती होत असताना अशी काही घटना घडली की तिला आणि नवंजात शिशुला कसे वाचवायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. मात्र तीन स्त्री रोग तज्ञ डॉ्टरांच्या साह्याने त्यांना वाचविण्यात यश आले. जी घटना घडली ती आजवरच्या एवढ्या अनुभवावरून लाखात एखादी घटना घडते.
त्या महिलेला टियर 4 ची जखम झाली होती. शक्यतो अश्या परिस्थितीत वाचविणे अवघड असते. परंतू शर्थीचे प्रयत्न व देवाचा आशीर्वाद घेत आज त्यांना आम्ही वाचविले, यांचा जास्त आनंद होतो आहे. अस उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ. पांडुरंग दोडगे, डॉ. आनंद साबणे अणि राऊत हॉस्पिटलचे डॉ. चंद्रशेखर राऊत यांनी यावेळी डिजीटल प्रभातशी बोलताना सांगितले.
काय घडली घटना…
उप जिल्हा रुग्णायात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागांतील महिला गर्भवती महिला प्रसूती साठी येत असतात. मुख्य खाजगी रुग्णालयात बाळंतपणाचा खर्च परवडत नाही, दुसरे म्हणजे उप जिल्हा रुग्णालयात मोफत सेवा. ही महिला सुध्दा पोटात दुखु लागल्याने साधारण १० जानेवारी रोजी रूग्णालयात दाखल झाली.
त्यावेळी त्या महिलेची प्रथमच प्रसूती होती. तिचे नाव मेगा टापरे त्यावेळी डॉक्टर यांनी तपासणी करून एक दोन दिवसांत प्रसूती होईल असा अंदाज दिला. ठरल्या प्रमाणे १२ जानेवारी रोजी त्या महिलेला प्रसूती विभगात नेले, अणि उपचारास सुरुवात केली.
प्रसूती दरम्यान त्या महिलेला टियर 4 ची जखम झाली होती. अर्थात जागा फटण्याचे प्रकार असतात. त्यातील चतुर्थ श्रेणीतील जखम त्यांना झाली होती. यावर तत्काळ त्यांना भुल तज्ञ डॉक्टर कदम मॅडम ह्यांच्या साह्याने भूल देऊन त्यांची शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. या दरम्यान टियर 4ची जखम मोठ्ठी गुंतागुंतीची असते. मात्र योग्य पद्धतीने शस्त्रक्रिया करून डॉक्टर यांनी त्या महिलेला जीवदान दिले.
टियर 4 ची शस्त्रक्रिया अ यशस्वी झाली असती तर…
अश्या परिस्थितीत शस्त्रक्रियास फेल किंवा अपयश आले असते तर त्या महिलेला शौचास कधी होते अणि लघवी कधी होते, याचे नियंत्रण करतां आले नसते. आणि भागातील संवेदना सुध्दा जाणविल्या नसत्या. थोडक्यात तिला कधी काही झाले असते ते समजले नसते.
टियर म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत
लघवीची जागा आणि शौचाची जागा याभागातील अंतर. ह्यातील अंतर कमी होणे म्हणजेच त्याजागी जखम होणे, ती जागा फाटत जाणे.. ह्यासुधा प्रकार आहेत, जसे की टियर 1 , टियर 2, टियर 3, सर्वात शेवटी, मोठी जखम किंवा गुंतागुतीचा भाग अर्थात टियर4… ह्यामध्ये दोन्ही जागेतील अंतर निकामी होते,अणि अश्यावेळी तो एकच भाग होतो. थोडक्यात तेथील अंतर फाटते..
का होतीय चर्चा…
आज घडीला पाहिले तर भोर हा डोंगरी आणि ग्रामीण भाग. वैद्यकीयचे अद्यावत तंत्रज्ञान आणि सुविधा यांचा अभाव. किंवा बोटावर मोजण्याइतकच्या. त्यात येथील लोकांची अर्थव्यवस्था शेतीवर. मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागांतील गर्भवती महिला पारिस्थीमुळे उप जिल्हा रुग्णालयाचा आधार घेतात.
परिस्थतीमुळे योग्य उपचार घेता आले नाही म्हणून अनेकांनी आपले प्राण देखील गमाविले आहेत. मात्र आज उप जिल्हा रुग्णालयात इतक्या गुंतगुतीच्या शस्त्रक्रिया होत आहेत. तीन पेक्षा जास्त स्त्री रोग तज्ञ डॉक्टर यांची टीम आहे, त्यामुळे ह्या रुग्णालयाचा मोठा आधार येथील नागरिकांना मिळत आहे. आज बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप घरी जात आहेत.