ब्रिटनमध्ये महिला डॉक्टरबाबत भेदभाव; पुरुष डॉक्टरांच्या तुलनेत कमी संधी उपलब्ध होत असल्याचा दावा

लंडन – सामाजिकदृष्ट्या ब्रिटन हा पुढारलेला देश मानला जात असला तरी या देशांमध्येही वैद्यकीय क्षेत्रामध्ये महिलांबाबत भेदभाव होत.

असल्याच्या गोष्टी समोर येत आहेत कामाच्या ठिकाणी महिलांबाबत होणारा भेदभाव ही चिंताजनक बाब असली तरी आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ही बाब दिसत आहे.

ब्रिटनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नव्या अहवालाप्रमाणे दहापैकी नऊ महिला डॉक्टरांना अशा प्रकारचा भेदभाव सहन करावा लागत आहे पुरुष सहकार्‍यांकडून होणारी छेडछाड किंवा योग्य संधी न मिळणे किंवा पुरुष सहकाऱ्यांना मसाज करण्याची केलेली

सक्ती अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा धक्कादायक खुलासा या अहवालात करण्यात आला आहे. ब्रॉटिश मेडिकल असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणात या बाबी समोर आल्या आहेत.

या सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या 91% महिलांनी आपल्या सोबत दुर्व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे ७० टक्के महिला डॉक्टरांनी आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे काम मिळत नसल्याची ही तक्रार केली आहे.

आणि आपल्या कार्यक्षमतेबाबत शंका घेत असल्याचा आरोप केला आहे 30 टक्के महिला डॉक्टराणी कामाच्या ठिकाणी आपल्याशी लैंगिक दुर्व्यवहार झाल्याचा आरोपही केला आहे.

हे काम करणार्‍या महिला डॉक्टरांच्या कार्यक्षमतेबाबत ही शंका घेतल्या जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. हा भेदभाव फक्त अशा प्रकारचा सामाजिक व्यवहारापुरता मर्यादित नसून आर्थिक बाबतीतही हा व्यवहार तसाच आहे.

पुरुष डॉक्तरांच्या तुलनेत महिला डॉक्टरांना 30 टक्के कमी वेतन दिले जात आहे. २१ व्या शतकात अशा प्रकारचा भेदभाव ब्रिटन सारख्या देशात समोर येणे चिंताजनक बाब असल्याचे या संघटनेच्या प्रतिनिधी डॉक्टर लतीफ पटेल यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.