झेक रिपब्लिकमधील संशोधकांनी अंतराळातील एक सर्वात वेगवान ताऱ्याचा शोध घेतला आहे. या तार्याचा वेग 8 हजार किलोमीटर प्रतिसेकंद असून तो याच वेगाने “ब्लॅक होल”ला घिरट्या घालत आहे. या वेगाने “ब्लॅक होल”ची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्याला चार वर्षे लागत आहेत. शास्त्रज्ञांनी या तार्याचे नाव एस 4716 असे ठेवले आहे.
पृथ्वीवरून सूर्याचे अंतर पार करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्या शंभरपट अंतरावर हा तारा “ब्लॅक होल”पासून घिरट्या घेत आहे. पृथ्वीच्या परिमाणाचा विचार करता हे अंतर खूप वाटत असले तर शास्त्रज्ञांच्या मते अवकाशातील अंतराच्या मानाने हे अंतर खूपच कमी आहे.
“अस्ट्रोफिजिकल जर्नल” नावाच्या एका नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ब्रह्मांडातील “ब्लॅक होल” परिसरामध्ये अनेक तारे आसपास दिसत असतात. त्यापैकी हा सर्वात वेगवान तारा असल्याचे सिद्ध झाले आहे.
बुलेट ट्रेन जाणार चंद्रावर? जपानमध्ये बनणार आहे ‘स्पेस एक्सप्रेस’ !
“ब्लॅक होल”च्या आसपास तार्यांचा पुंजका आहे. त्यामुळे एक एक स्वतंत्र ताऱ्यांचे निश्चित विश्लेषण करणे अनेकवेळा अवघड जाते. गेली वीस वर्षे या पुंजक्याचे संशोधन सुरू होते. त्यानंतर त्यातील हा सर्वात वेगवान तारा संशोधकांच्या लक्षात आला.
डोळ्यांची समस्या सतावतेय?; ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता ठरू शकते घातक !