मुंबई – राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आदर्श आचारसंहितेमध्ये सवलत दिली आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने दुष्काळ निवारणाच्या कामाला परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे, अशा ठिकाणी कामे करण्यास बंधन नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे.
Election Commission of India has given relaxation in Model Code of Conduct in Maharashtra and has allowed state govt to carry out drought relief work. pic.twitter.com/NZO1jtj50u
— ANI (@ANI) May 6, 2019
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राद्वारे राज्यातील आचारसंहिता शिथील करण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर दोनच दिवसांपुर्वी राज्यमंत्रीमंडळाची बैठक घेऊन त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला होता.