Hyundai Grand i10 Nios Offer: भारतीय बाजारात 6 ते 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या कार्सला विशेष मागणी आहे. कंपन्यांकडूनही या बजेटमध्ये येणाऱ्या अनेक शानदार कार लाँच केल्या जातात. याशिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडूनही गाडीवर बंपर डिस्काउंट देखील दिले जाते. तुमचे बजेट देखील 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत असल्यास ह्युंडाईची लोकप्रिय कार खरेदी करू शकता.
ह्युंडाईची लोकप्रिय हॅचबॅक Grand i10 Nios वर फेब्रुवारी 2025 दरम्यान मोठी सूट मिळत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहकांची 68,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. अधिक सवलतीसाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधू शकतात. मात्र, ही ऑफर शहरानुसार वेगवेगळी असू शकते.
Hyundai Grand i10 Nios च्या किंमतीबद्दल सांगायचे तर या कारची सुरुवाती किंमत 5.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 8.62 लाख रुपये (एक्स-शोरूम) खरेदी करावे लागतील. डिस्काउंटचा फायदा मिळाल्यानंतर कारला अजूनच स्वस्तात खरेदी करता येईल.
कारच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Hyundai Grand i10 Nios मध्ये 1.2-लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 83bhp पॉवर आणि 113.8Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याशिवाय कारमध्ये ग्राहकांना सीएनजी पर्याय देखील मिळतो.
हुंडाई ग्रँड i10 Nios मध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, यूएसबी टाइप-C चार्जर आणि अॅम्बियंट लाइटिंग यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्स आणि रियर पार्किंग कॅमेराही उपलब्ध आहे.