‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच – अखिलेश यादव यांनी मोदींवर केली खोचक टीका

नवी दिल्ली – ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली.  राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यानंतर आता मोदी-शहा पत्रकार परिषदेवर मोठ्या प्रमाणात टीकांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

सपा नेते ‘अखिलेश यादव’ यांनी देखील या पत्रकार परिषदेवर आपले मत व्यक्त केले आहे. “असे दिसते की ‘मन की बात’ चा शेवटचा भाग रेडिओऐवजी टीव्हीवर प्रसारित केला गेला आहे”. बिचारे पत्रकार प्रश्नांची वाट पाहत बसले आणि ‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच बसून राहिले. अशी टीका अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर आकाउंड वरून केली आहे.
मोदी- शहाची ही पत्रकार परिषद भाजपच्या मुख्यालयात पार पडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.