नव्या 381 करोनाबाधितांची पडली भर
करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,945
नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 465 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 945 झाली आहे. दरम्यान, आज 64 नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 136 इतकी झाली असून, एकूण रुग्ण संख्या 3 हजार 132 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 64 जण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहरात दोन रुग्ण अढळून आले आहेत. संगमनेर येथील पद्मानगर चार, बाजारपेठ, जनतानगर प्रत्येकी दोन, जेढे कॉलनी तीन, संगमनेर शहर तीन, विद्यानगर दोन, बडोदा बॅंक तीन, राजापूर दोन, कोंची एक, पिंपळगाव देपा एक, सुकेवाडी तीन, शिबलापूर एक, गणेशनगर तीन, कुरण एक, मुटकुळे हॉस्पिटल एक, खंडोबागल्ली दोन, गुंजाळवाडी एक, जवळे कडलग येथे एक रुग्ण सापडला.
कर्जत तालुक्यात राशीन येथे चार, मिरजगावला तीन, कर्जत शहरात दोन, पिंपळवाडीत एक, राहाता तालुक्यात शिर्डी येथे दहा, नांदुरखीत एक, गोगलगावात एक, राहुरी तालुक्यातील राहुरी बु. एक, येवले आखाडा एक, वांबोरी एक, कात्रड येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात काल 280 रुग्णांची भर पडल्याने नगरकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आज 465 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एक प्रकारे नगरकरांना दिलासाच मिळाला आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या अशी ः मनपा- 279, संगमनेर- 33, राहाता -29, पाथर्डी-4, नगर ग्रामिण- 15, श्रीरामपूर-24, कॅन्टोन्मेंट- 3, नेवासे- 15, श्रीगोंदा -17, पारनेर- 12, अकोले- 6, राहुरी- 11, शेवगाव- 8, कोपरगाव -3, जामखेड- 1, कर्जत- 5.