नगर : नगर जिल्ह्यात आज 3 हजार 799 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 81 हजार 085 इतकी झाली आहे. आजही नवीन रुग्णवाढीपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची जास्त असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
नगर जिल्ह्यात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.51 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 3 हजार 327 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 25 हजार 928 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 220, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 415 आणि अँटीजेन चाचणीत 692 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 65, अकोले 22, जामखेड 221, कर्जत 53, कोपरगाव 18, नगर ग्रामीण 97, नेवासा 99, पारनेर 78, पाथर्डी 103, राहता 21, राहुरी 13, संगमनेर 19, शेवगाव 269, श्रीगोंदा 73, श्रीरामपूर 30, कँटोन्मेंट बोर्ड 13 आणि इतर जिल्हा 26 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 277, अकोले 30, जामखेड 05, कर्जत 13, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 199, नेवासा 73, पारनेर 57, पाथर्डी 21, राहाता 246, राहुरी 57, संगमनेर 158, शेवगाव 33, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 99, कँटोन्मेंट बोर्ड 11 आणि इतर जिल्हा 34 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 692 जण बाधित आढळून आले. मनपा 79, अकोले 01, जामखेड 49, कर्जत 43, कोपरगाव 42, नगर ग्रामीण 46, नेवासा 41, पारनेर 61, पाथर्डी 51, राहाता 29, राहुरी 103, संगमनेर 13, शेवगाव 25 श्रीगोंदा 64, श्रीरामपूर 37, कँटोन्मेंट 02 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 544, अकोले 192, जामखेड 13, कर्जत 267, कोपरगाव 209, नगर ग्रामीण 316, नेवासा 169, पारनेर 198, पाथर्डी 127, राहाता 259, राहुरी 183, संगमनेर 566, शेवगाव 155, श्रीगोंदा 346, श्रीरामपूर 103, कॅन्टोन्मेंट 61, मिलिटरी हॉस्पिटल 14, इतर जिल्हा 73 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपडेट्स
– बरे झालेली रुग्ण संख्या :1,81,085
– उपचार सुरू असलेले रूग्ण :25928
– जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 2301
– एकूण रूग्ण संख्या : 2,09,314