नगर : नगर जिल्ह्यात आज 3 हजार 553 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 34 हजार 491 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.32 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 3 हजार 493 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 23 हजार 203 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 850, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 56 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 587 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 174, अकोले 02, जामखेड 120, कर्जत 102, कोपरगाव 77, नगर ग्रामीण 33, नेवासा 15, पारनेर 34, पाथर्डी 48, राहता 73, राहुरी 04, संगमनेर 02, शेवगाव 45, श्रीगोंदा 51, श्रीरामपूर 33, कँटोन्मेंट बोर्ड 34 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 468, अकोले 04, जामखेड 07, कर्जत 14, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 126, नेवासा 38, पारनेर 46, पाथर्डी 09, राहाता 151, राहुरी 20, संगमनेर 36, शेवगाव 06, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 34, कँटोन्मेंट बोर्ड 29 आणि इतर जिल्हा 23 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1587 जण बाधित आढळून आले. मनपा 273, अकोले 35, जामखेड 27, कर्जत 136, कोपरगाव 29, नगर ग्रामीण 191, नेवासा 87, पारनेर 80, पाथर्डी 41, राहाता 177, राहुरी 130, संगमनेर 83, शेवगाव 157 श्रीगोंदा 45, श्रीरामपूर 46, कॅन्टोन्मेंट बोर्ड 33 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 836, अकोले 188, जामखेड 79, कर्जत 158, कोपरगाव 143, नगर ग्रामीण 340, नेवासा 204, पारनेर 124, पाथर्डी 193, राहाता 311, राहुरी 199, संगमनेर 217, शेवगाव 152, श्रीगोंदा 98, श्रीरामपूर 97, कॅन्टोन्मेंट 74, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 126 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.