सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतल्यानंतर 29 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले, तर शंभर जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 28, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 12, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 60, अशा एकूण शंभर जणांच्या स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
एकूण नमुने – 298970
एकूण बाधित – 55390
घरी सोडण्यात आलेले – 52815
मृत्यू – 1804
उपचारार्थ रुग्ण – 771