कोयना धरणातून १०४१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग

पाटण (प्रतिनिधी) – कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट नऊ इंच उचलण्यात असून धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. दरवाजांमधून ९३६० तर पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक असे १०४१० क्यूसेक पाणी पात्रात सोडण्यात येत आहे.

धरण ८० टक्क्यांहून अधिक भरले असून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे उचलण्यात आले आहेत. सांडव्यावरून ९३६० व धरण पायथा विजगृह मधून १०५० असा एकूण १०४१० क्युसेक पुराच्या पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

कोयना धरणात आज ८५.५९ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीपातळी २१४७.०३ फूट आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे १३६ नवजा येथे ८२ व महाबळेश्वर येथे १५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात पाण्याची एकूण आवक ४१३८९ क्यूसेक आहे

Leave A Reply

Your email address will not be published.