मासळकर ः करंदीत मुलांना प्रात्यक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापनाची माहिती
शिक्रापूर-ग्रामीण भागातील मुलांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असणे गरजेचे असून अलीकडील काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज होत चालली आहे. त्यामुळे सर्वांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत स्टार सेफ लाइन या आपत्ती व्यवस्थापन समूहाचे सतीश मासळकर यांनी व्यक्त केले.
करंदी येथील विद्या विकास मंदिर येथे पोलीस पाटील वंदना साबळे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व शिक्षक यांना आपत्ती व्यवस्थान याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे पाटील, प्राचार्य कैलास ढमढेरे, बबनराव उकिर्डे, गुलाब डाळिंबकर, ओमप्रकाश जाधव, अरुण जाधव, राहुल पाटील, प्रतिभा जाधव, रोहित कापरे, प्रणीत सातपुते, योगेश कडलग, प्रियांका भंडारे, माधुरी सातपुते यांसह आदी उपस्थित होते. यावेळी स्टार सेफ लाइन या आपत्ती व्यवस्थापन समूहाचे सतीश मासळकर व सूर्यकांत जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्याक्षिकांसह आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली.
भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा व त्यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचा अभ्यास व व्यवस्थापन करणारी स्वतंत्र यंत्रणा असावी व सर्वप्रकारे उत्तमरीत्या प्रशिक्षित असणारी यंत्रणा शासकीय, सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवरही असणे हे क्रमप्राप्त आहे. आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज असून समाजातील प्रत्येक व्यक्ती हा स्वतःची काळजी घेणारा असावा, या हेतुने आज विद्यालयातील शिक्षक व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले असल्याचे सतीश मासळकर यांनी सांगितले. तर सूर्यकांत जधव यांनी आग व आगीचे प्रकार व ती विझवण्यासाठी वापरण्यात येणारे साधन या विषयावर सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन रोहित कापरे सर यांनी केले तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांनी केले आणि बबनराव उकिर्डे यांनी आभार मानले.