शाहरुखच्या बंगल्याबाहेर डायरेक्‍टरचा मुक्‍काम

बॉलीवूडच्या “किंग खान’चे बॉलीवूडबाहेरही हजारो चाहते आहेत. शाहरुखला पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर तासन्‌तास ताटकळत राहणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र, शाहरुखला आपल्या सिनेमामध्ये घेण्यासाठी सध्या एका डायरेक्‍टरने त्याच्या बंगल्याबाहेर चक्‍क मुक्‍काम ठोकला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखला आपल्या सिनेमाची कथा ऐकण्यासाठी हा युवा डायरेक्‍टर मन्नत बंगल्याबाहेर नेहमी उभा असतो. शाहरुखच्या फॅन्सने देखील त्याची दखल घेतली आहे आणि त्यांनी या डायरेक्‍टरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे. किमान हे फोटो आणि व्हिडिओ बघून शाहरुख या डायरेक्‍टरची कथा ऐकेल आणि त्याच्या सिनेमांमध्ये काम करायला तयार होईल, अशी त्यांची भाबडी अपेक्षा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

अद्याप शाहरुखने या डायरेक्‍टरला काही दाद लागू दिलेली नाही. मात्र, लवकरच त्याला या डायरेक्‍टरची दखल घ्यावी लागेल. शाहरुखचा आगामी सिनेमा ‘पठाण’ लवकरच रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

त्यामध्ये त्याच्यासमवेत दीपिका पदुकोण, शाजी चौधरी, जॉन अब्राहम आणि डिंपल कपाडिया असणार आहेत. “पठाण’व्यतिरिक्‍त राजकुमार हिरानी, एली कुमार आणि राज डिके यांच्या सिनेमांमध्ये शाहरुख खान काम करणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.