आंध्र प्रदेश – रूग्णवाहिकेतून पावणेतीन कोटींचा गांजा जप्त

विशाखापट्टनम – आंध्र प्रदेशच्या विखाखापट्टनम मध्ये अवैधपणे गांजाचा धंदा करणाऱ्यावर  कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान एका रूग्णवाहिकेतून 1813 किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत 2 कोटी 71 लाख, 95 हजार रूपये आहे.

आंध्र प्रदेशच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डायरेक्ट्रेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस) कारवाईत हा गांजा पकडण्यात आला आहे. चिंताजनक बाब म्हणजे ज्या रूग्णवाहिकेचा वापर रूग्णाचे प्राण वाचविण्यासाठी करायला हवा त्याचा वापर हा नशेकरिता लागणाऱ्या अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.