शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

शिरूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी आपल्या हाती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असल्याचे जाहीर झाले आहे. त्यांच्याबरोबर माऊली सोसायटी मांडवगण फराटाचे चेअरमन रवींद्र फराटे यांनी देखील आपल्या हाती शिवबंधन बांधले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून सुधीर फराटे हे कुठल्या ना कुठल्या पक्षात प्रवेश करतील असे असताना आज अचानक त्यांनी शिवसेनेमध्ये जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, यामुळे शिरूर तालुक्यात शिवसेनेची पूर्व भागात ताकद वाढणार आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये खासदार आढळराव पाटील यांनी जनसंपर्क वाढवला असून पक्षबांधणीचे काम जोरात सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये आपले स्थान भक्कम करत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील अनेक दिग्गज मंडळी शिवसेनेकडे वळल्याचे चित्र निर्माण झाले आहे .

सुधीर फराटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते परंतु गेल्या चार सहा महिन्यापासून दोघांमध्ये कुजबुज निर्माण झाली होती. त्यातूनच हा पक्ष प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली कटके हे शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असून आजच्या प्रक्ष प्रवेशाने त्यांची ताकद नक्कीच वाढली आहे. तर माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षवाढीसाठी स्वतःला झोकून दिल्याचे व शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्याचे काम योग्य दिशेने सुरू केले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.