मुंबई – प्रख्यात अभिनेते आणि चित्रपट निर्माते ‘महेश मांजरेकर’ यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्डच्या नावे महेश मांजरेकर यांच्याकडे 35 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याबाबत दादर पोलीस ठाण्यात मांजरेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
महेश मांजरेकर यांना गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम टोळीकडून ही धमकी दिली आल्याची माहिती आहे.
#Correction Director & actor Mahesh Manjrekar received an extortion* call from a person, in the name of underworld don Abu Salem. Anti-extortion cell has arrested an accused, who was trying to extort Rs 35 crore through the threat call: Mumbai Police
— ANI (@ANI) August 27, 2020
दरम्यान, महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रत्नागिरीतील खेड येथून 32 वर्षाच्या युवकाला ताब्यात देखील घेतले आहे.
मांजरेकर यांनी चित्रपटसृष्टीला वास्तव, काटे, हत्यार याशिवाय लालबाग परळ, काकस्पर्श, नटसम्राट असे अनेक हिंदी-मराठी सुपरहिट चित्रपट दिले आहे.