नवी दिल्ली – देशात चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून तो सुमारे 16.90 लाख कोटी रुपये इतका झाला आहे. तसच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अहवालानुसार देशात सकल प्रत्यक्ष कर संकलनातही 20 टक्क्यांची वाढ झाली असून तो आतापर्यंत 20 लाख कोटीच्या वर संकलित झाला आहे. मागील आर्थिक वर्षात तो या काळात 17 लाख कोटी इतका होता. या सकल प्रत्यक्ष कर संकलनात कॉर्पोरेटकर क्षेत्राचा वाटा 10 लाख कोटी तर इतर क्षेत्रांचा वाटा 11 लाख कोटी इतका आहे.
जीएसटी संकलनात वाढ –
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 7. 3 टक्क्यांची वृद्धी नोंदवून 1.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.64 लाख कोटी इतकं होतं. डिसेंबर 2024 मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 32 हजार 836 कोटी रुपये आणि राज्य जीएसटी संकलन 40 हजार 499 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटी संकलन 47 हजार 783 कोटी रुपये झालं असून उपकर 11 हजार 471 कोटी रुपये इतका आहे.