माओवादी आणि नक्षली संघटनांचे हिजबुल मुजाहिद्दीनशी थेट संबंध

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारचा हायकोर्टात गौयस्फोट

मुंबई: पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या संशय असल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गौतम नवलखा आणि माआवाद्यांचा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना महिजबुल मुजाहिद्दीन सोबत थेट संबंध आहेत. असा घणघाती गौप्यस्फोट राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात केली. नवलखा यांच्या याचिकेवर सरकारी वकील ऍड. अरूणा कामत पै यांनी हा गौप्यस्फोट करताना भीमा-कोरेगावच्या घटनेवरून हे सारे प्रकरण उघडकीस आले आहे, तसेच या तपासातून जी माहिती समोर आली त्यातून या प्रकरणातील सर्व आरोपींना देशाविरोधात युद्धच पुकारायचे होते असा आरोपही केला.

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारच्यावतीने ऍड. अरूणा कामत पै यांनी विचारवंत गौतम नवलखा यांनी नेहमीच सरकारविरोधात भूमिका घेतलेली आहे आणि नक्षलवाद्यांची बाजू घेतली आहे असा आरोप करताना हिजबुल मुजाहिद्दीन या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून नक्षलींना तसेच माओवाद्यांना शस्त्रास्त्र, विस्फोटकं आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी सर्वोतोपरी सहकार्य मिळत होते.

तसेच शकील बक्‍शी या इस्लामिक संघटनेशी संबंध असलेल्या व्यक्तीला नवलखा भेटेले होते. त्या बक्‍शीचे ह्युरिएत कॉंफन्सच्या सैय्यद गिलानी यांच्याशीही संबंध होते. यासंबंधीचे पुरावे अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंगच्या लॅपटॉपमधून मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा जप्त केलेला गोपनीय मजकूर पुरावे म्हणून हायकोर्टात सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या इतर आरोपींनाही शहरी आणि ग्रामीण नक्षलवादाशी संबंधित जबाबदारी ठरवून दिलेली होती. अशी माहिती ही न्यायालयात देताना या प्रकरणातील अन्य आरोपींकडून मिळालेली काही पत्रे आणि नवलखा यांच्या लॅपटॉपमधील काही मजकूराचा उल्लेख यावेळी केला. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये साल 2017 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्याच्या कटातहीचा सहभाग होता असे या पत्रांवरुन दिसते, या समूहाचे नवलखा सदस्य होते त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)