मनाली – ऐशीच्या दशकातील अभिनेत्री दीप्ती नवल ही तिच्या हिमाचल प्रदेशातील कॉटेजमध्ये रहात असताना तिला हृदयविकाराचा झटका आला होता. मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्यानंतर आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दीप्ती नवल यांना वास्तविक रविवारी पहिल्यांदा हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि सोमवारी उशिरा त्यांना कार्डियाक केअर ऍम्ब्युलन्समध्ये रुग्णालयात आणण्यात आले.
नवल यांची प्रकृती स्थिर असून तिला लवकरच घरी सोडण्यात येईल, असे एका डॉक्टरने वृत्तसंस्थेला सांगितले. “चष्मे बद्दूर’, “अंगूर’, “रंगबिरंगी’, “श्रीमान श्रीमती’, “कथा’ आणि “मोहन जोशी हाजिर हो…’ अशा विविध हलक्या-फुलक्या सिनेमांतील अभिनयाद्वारे नवल यांनी आपली एक वेगळी ओळख जपली आहे.