नगर -रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, तुरळक फटाक्यांची आतषबाजी, हवेत सोडलेल्या आकाश दिव्यानी उजळलेले आसमंत, हातात असलेल्या दिव्यांचा प्रकाश तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला.लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, निरंजन सेवाभावी संस्था व शासकीय बाल निरिक्षण समितीचे दीपोत्सव-2020 चे करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थेतील मुलांना एकत्र न करता स्नेहालयासह, अनामप्रेम, राहुरी येथील मुलींचे वसतिगृह, मनसेवा प्रकल्प, स्नेहांकुर, बालभवन, बाल निरीक्षणगृह अशा आठ संस्थेस भेट देऊन एकाच दिवशी सातशेपेक्षा जास्त वंचित घटकातील मुलांसह दिवाळी साजरी करण्यात आली.
या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्सचे उपप्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी डॉ.एस.एस. दीपक, शरद मुनोत, मोहन मानधना, ऍड. जयवंत भापकर, ऍड. ममता नंदनवार, लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, खजिनदार सुधीर लांडगे, प्रकल्प प्रमुख किरण भंडारी, आनंद बोरा, डॉ. सिमरन वधवा, डॉ.मीरा बडवे, धनंजय भंडारे, हरजितसिंह वधवा, निरंजन सेवा संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा, किरण दीपक, ज्योती दीपक, सतीश बजाज, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, अनिल गावडे अदी उपस्थित होते.