रणबीर कपूर धोकेबाज – दीपिका

बॉलिवूडमध्ये नाती जुळणे आणि बिघडणे ही अगदी सामान्य बाब आहे. एखाद्या अॅॅक्‍टर आणि अॅॅक्‍ट्रेसचे अफेअर सुरू होणे आणि ब्रेक अप होणे ही तर नित्याचीच बाब आहे. जितक्‍या लवकर रिलेशनशीप डेव्हलप होते, तितक्‍याच लवकर ब्रेक अपही होतो. पण त्यामुळे कोणाचेही करिअर थांबत नाही आणि कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये तणावही निर्माण होत नाही. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्यात पूर्वी जोरदार दोस्ती होती. काही काळ त्यांचे अफेअरही चालले. मात्र रणबीरच्या तऱ्हेवाईक स्वभावामुळे दीपिकानेच त्याच्याशी फारकत घेतली. कालांतराने रणबीरचे कतरिना कैफ आणि आता आलियाशी नाते जुळले आहे. तर दुसरीकडे दीपिकानेही रणबीरच्या जागेवर रणवीरची निवड केली आहे. आता त्यांच्या लग्नाचीही तयारी सुरू झाली आहे. पण एवढ्या सगळ्या घडामोडींनंतरही दीपिका रणबीरला विसरू शकलेली नाही. त्याच्याबद्दलचा राग तिने एका इंटरव्ह्यूमध्ये बोलून दाखवला. रणबीर चक्क धोकेबाज निघाला असे ती उघडपणे बोलून गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मी त्याला “रंगे हाथों’ पकडले होते. याच काळानंतर मी सगळे इमोशन बाजूला ठेवले आणि रणबीरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.’ असे तिने सांगितले. जेंव्हा दीपिका रणबीरबरोबर रिलेशनशीपमध्ये होती, तेंव्हा तिला अनेकांनी सतर्क केले होते. रणबीर तुला धोका देतो आहे, असे सांगितले होते. ही बाब तर दीपिकालाही माहिती होती. पण रणबीरने तिच्यासमोर अक्षरशः आपल्या रिलेशनशीपची भीकच मागितली होती. त्यामुळे भावनिक दीपिकाने त्याला एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरच रणबीरला “रेड हॅन्डेड’ पकडल्यानंतर तिला आपली चूक समजली.
दीपिकाचीही 2-3 अफेअर झाली आहेत. पण एक रिलेशनशीप सुरू असताना दुसऱ्याबरोबर कधीच लपाछपी खेळली नाही. असे काही करण्यापेक्षा “सिंगल’ राहिलेली बरी, असेही तिने सांगितले.

काहीही असले तरी रणबीर कपूरने दीपिकाला काय धोका दिला, हे मात्र समजू शकलेले नाही. दीपिकाने रणबीरला “रेड हॅन्डेड’ पकडले म्हणजे नक्कीच काही तरी गौडबंगाल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)