सलमान आणि दीपिका आता एकत्र काम करणार नाही

सलमान खान आणि दीपिका पदुकोण कधी एका सिनेमात एकत्र काम करणार याची, त्या दोघांचेही फॅन वाट बघत असावेत. मात्र आतापर्यंत तरी असे घडलेले नाही. यापुढेही हे दोघे एकत्र काम करण्याची शक्‍यता नाही. त्याचे कारण आता कुठे समजले आहे. सलमान आणि दीपिका या दोघांमध्ये काही गोष्टींवरून जोरदार मतभेद आहेत.

त्यामुळे या दोघांनी एकत्र काम करणे शक्‍यच नाही. सलमानला त्याच हिरोईनबरोबर काम करायला आवडते, ज्या त्याला प्रसिद्ध होण्यास मदत करतात आणि त्याने केलेल्या प्रत्येक जोकवरती हसतात. पण दीपिका यापैकी नाही. ती सलमानच्या प्रत्येक जोकला प्रतिसाद देईलच असे नाही.

याशिवाय काही दिवसांपूर्वी डिप्रेशनच्या मुद्दयावरून दोघांमध्ये मतभेदही झाले होते. डिप्रेशनमध्ये असताना आपल्या प्रत्येक क्षणाला संघर्ष करावा लागला होता, असे दीपिका म्हणाली होती.

तर या औदासिन्यामुळे माणूस इमोशनल होण्याची शक्‍यता असते. पण हे भावनिक होणे व्यक्‍तीच्या स्वभावाविरोधात असू शकते, असे सलमान म्हणाला होता. त्यामुळे सलमानबरोबर दीपिका काम करेल, याची काही शाश्‍वती नाही. या सर्व गोष्टींमध्ये किती तथ्य आहे, हे लवकरच समजेल. पण सध्या तरी सलमान आणि दीपिका एकत्र काम करण्याची शक्‍यता नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×