चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी, सलामीच्या सामन्यात हा खेळाडू खेळणार…

 

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि यंदा ही स्पर्धा भारतात नसून यूएईमध्ये होत आहे. त्यातच चेन्नई संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध होणार्‍या सामन्यात दीपक चहर खेळणार आहे, अशी माहिती चेन्नई सुपर किंगचे सी.ई. ओ. कासी विश्वनाथ यांनी दिली.

दीपक चहर हा कोरोना चाचणी मध्ये पॉझिटिव्ह आढळा होता, त्यामुळे तो सलामीच्या सामन्यात खेळणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती, मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर गेल्या आठवड्यातील शुक्रवार पासून सराव सुरू केला होता आणि आता फिट असून सलामीच्या सामन्यात खेळणार आहे.

तो संघातील प्रमुख गोलंदाज आहे शिवाय तो अंतिम षटकांत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, धावांवर अंकुश लावून बळी टिपण्यात माहीर असल्याने धोनीचा विश्वास संपादीत केला, असून हुकमी बळी टिपणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत चेन्नई संघासाठी गोलंदाजी करताना त्याने 34 सामन्यात 26.52 च्या सरासरीने 33 बळी टिपले आहेत. त्यामुळे सलामीच्या सामन्यात त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.