टायगर श्रॉफ आणि दिशा या जोडीने भलेही आपल्या रिलेशनशिपबाबत आतापर्यत स्पष्टपणे दुजोरा दिलेला नसला तरी त्यांच्या अफेयरची सतत चर्चा सुरू असते. “भारत’च्या मुलाखतीवेळी दिशा म्हणाली होती की, माझे प्रेम एकतर्फी असून मी कायम त्याच्यासोबत मित्रत्वाचे नाते कायम ठेवू इच्छिते.
हे दोघेजण पुन्हा एकदा डिनर डेटवर गेल्याचे स्पॉट करण्यात आले आहे. याप्रसंगी टायगर व्हाईट टी शर्ट आणि ब्ल्यू डेनिमसोबत यलो शूजमध्ये स्पॉट करण्यात आला. तर दिशा लाईट ब्ल्यू बॉडीकॉन वनपीससोबत व्हाईट स्नीकर्समध्ये खुपच सुंदर दिसत होती. या दोघांनी माध्यमांनाही हसतमुखाने पोझ दिली. दरम्यान, यापूर्वीही अनेकवेळा टायगर-दिशा या दोघांना एकत्रित डिनर डेटवर जाताना पाहण्यात आले आहे.
पण काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेसोबत दिशाला डिनर सेटवर स्पॉट करण्यात आले होते, तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी दिशावर टायगरला सोडून आदित्यला डेट करत असल्याची टिकाटिपणी करण्यात आली होती. दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास टायगर सध्या आपल्या आगामी “बागी 3’मध्ये श्रद्धा कपूरसोबत झळकणार आहे. याशिवाय “वॉर’ चित्रपटात तो काम करत आहे. दुसरीकडे दिशा ही मोहित सुरी यांच्या “मलंग’मध्ये दिसणार आहे.