कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्स संघाला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. संघाच्या या खराब कामगिरीमुळे दिनेश कार्तिकच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत कार्तिकची कोलकाताच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात येण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, कार्तिकला हटवण्याची कोणतीही चर्चा न झाल्याचे मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिसने स्पष्ट केले.
राजस्थान रॉयल्स संघाने अजिंक्य रहाणेकडून कर्णधाराची जबाबदारी काढून घेतली, त्याच प्रकारे कोलकाताही कार्तिकला हटवण्याचा विचार करत आहे का? या प्रश्नावर कॅलिस म्हणाला, या विषयावर आम्ही चर्चा केलेली नाही आणि कोणीही हा मुद्दा उपस्थित केलेला नाही. त्यामुळे या चर्चांना काहीच अर्थ उरत नाही.