Dimple Kapadia Troll | अभिनेत्री डिंपल कपाडिया त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. 67 वर्षांच्या डिंपल यांनी मोठ्या पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत धुमाकूळ घातला आहे. सध्या त्या ‘गो नानी गो’ या त्यांच्या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकतेच डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांनी मुंबईत एका इव्हेंटला हजेरी लावली होती.
या कार्यक्रमादरम्यानचा डिंपल यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात डिंपल कपाडिया लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास नकार देत असल्याचे स्पष्ट दिसते. ज्यावरून त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. Dimple Kapadia Troll |
View this post on Instagram
व्हायरल व्हिडिओमध्ये डिंपल कपाडिया पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. तेव्हा पाठीमागून ट्विंकल खन्ना येते ते पाहून पापाराझी डिंपल यांना लेकीबरोबर फोटोसाठी पोझ देण्यास सांगतात. पण, डिंपल ट्विंकलसोबत फोटो काढण्यास स्पष्ट नकार देतात. “मी ज्युनियर्ससोबत पोझ देत नाही,” असे ट्विंकल व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. डिंपल कपाडिया यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. Dimple Kapadia Troll |
यावरून अनेक यूजर्स डिंपल यांना ‘दुसरी जया बच्चन’ म्हणत आहेत. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘ज्युनियर्ससोबत पोज देताना डिंपलला भीती वाटते की तिचे खरे वय दिसत नाही,’ असे म्हंटले आहे. तर आणखी एकाने ‘इथे पण ज्युनियर्स सिनियर असतं का?’, असे म्हणत डिंपल यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
दरम्यान, बुधवारी झालेल्या MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये बॉलीवूड कपल अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी ग्रँड एन्ट्री केली. या कार्यक्रमात डिंपल कपाडिया देखील सहभागी झाल्या होत्या. ‘गो नोनी गो’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सर्वांनी हजेरी लावली होती. Dimple Kapadia Troll |
हेही वाचा:
दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत; महायुतीच्या जागा वाटपावर होणार चर्चा