दिलीप वळसे पाटील यांची आज प्रचार सांगता सभा

मंचर – मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले असताना आंबेगाव-शिरूर विधानसभा मदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींनी प्रचारात रंगत आली आहे. दरम्यान, महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांची प्रचार सांगता सभा शुक्रवारी (दि. 18) मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली

हिंगे म्हणाले की, विरोधी पक्षांनी गेल्या 15 दिवसांत वळसे पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. दरम्यान, वळसे पाटील अत्यंत संयमी नेतृत्व असल्याने शुक्रवारी होणाऱ्या सभेत ते काय बोलणार, याकडे सर्व तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे हजारो मतदार या सभेला उपस्थित राहतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. तसेच या सांगता सभेत वळसे-पाटील विरोधकांना टीकेचे लक्ष्य करणार का? याबाबत

आंबेगाववासियांना उत्सूकुता लागून राहिली आहे. 15 दिवसांचा प्रचार पाहता स्वयंपूर्तीने शेतकरी, युवक-युवती व अबालवृद्ध उपस्थित राहण्याचे संकेत मिळत आहे. तरी या सभेला मतदारांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.