पिंपरी – देशाच्या अर्थ व्यवस्थेमध्ये तीन लाख चार्टर्ड अकौंटंटचे (सीए) मोलाचे योगदान असून “सीए’ हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असे मत राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काढले.
दि इंस्टीट्यूट ऑफ़ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ़ इंडिया (आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 40 नवीन सीएंचा निगडी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उत्पादन शुल्क व कामगारमंत्री वळसे पाटील यांनी फोनवरुन कार्यक्रमास संबोधित केले.
यावेळी सीए आनंद जखोटिया, ज्येष्ठ लेखापाल माजी अध्यक्ष छाब्रा, प्रसाद सराफ, प्रादेशिक कौंसिलचे माजी सदस्य डॉ. अशोककुमार पगारिया, आयसीएआय पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष सीए संतोष संचेती, उपाध्यक्षा सिमरन लिलावाणी, सचिव पंकज पाटणी, सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए विजयकुमार बामणे, सीए शैलेश बोरे, सीए चंद्रकांत काळे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शाखेस राष्ट्रीय स्तरावर तीन उत्कृष्ट शाखा पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष संचेती व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष संतोष संचेती यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार मिळणे ही गौरवार्थ आहे, असल्याचेही वळसे पाटील म्हणाले.
सीए संचेती म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचे 2025 पर्यंत 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न आहे. यामध्ये सीएंचे महत्वाचे योगदान असणार आहे. सूत्रसंचालन प्रतिमा भिसे तर, आभार पंकज पाटणी यांनी व्यक्त केले.