राजगुरूनगरात नागरिकांकडून जोरदार स्वागत
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या “घर टू घर’ दौऱ्याला उदंड प्रतिसाद लाभला असून या दौऱ्यात महाआघाडीचे तालुक्यातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तालुक्यातील गावागावांतील दौरा झाल्यानंतर आता “घर टू घर’ दौरा सुरू केल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गुरुवारी (दि. 10) राजगुरूनगर शहरातील प्रचार दौरा तिन्हेवाडी रस्ता, वाडा रस्ता, समतानगर, माळीमळा या शहरातील महत्त्वाच्या भागात काढण्यात आला.
यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले.यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर तुळवे, माजी पंचायत समिती सदस्य किरण आहेर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल (बाबा) राक्षे, अशोक राक्षे, विनायक घुमटकर, माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे, सागर पाटोळे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, नूतन आवटे, तालुका कॉंग्रेसच्या अध्यक्ष जया मोरे, राष्ट्रवादीच्या माजी तालुका अध्यक्षा साळूबाई मांजरे, अर्चना किर्लोस्कर, सुभाष होले, शांताराम चव्हाण, नितीन राक्षे, मछिंद्र राक्षे, संदीप सांडभोर, सतीश राक्षे, हेमलता टाकळकर, विकास चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या दौऱ्यानिमित्ताने घरी आलेले उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत, असे अनेक मतदारांनी सांगितले.
शहरातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देत तो सोडविला जाणार आहे. याबरोबरच पाच वर्षांत प्रलंबित असलेले रस्ते, कचरा प्रश्न व सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार