“पती, पत्नी और वो’मध्ये “दिलबरा’ हे गाणे मुख्य आकर्षण असणार आहे, असे काही दिवसांपूर्वी म्हटले गेले होते. मात्र आता हे गाणे या सिनेमातून वगळण्यात येणार आहे. भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यन हे दोघेजण पती-पत्नीच्या रोलमध्ये दिसणार आहेत. एका पार्टीच्या सीनमध्ये हे गाणे या दोघांवर चित्रीत झालेले होते. मात्र कथेचा विचार करता हे गाणे वगळण्याचा निर्णय निर्मात्यांनी केला आहे. भूमी पेडणेकरने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
या गाण्यात कार्तिक आर्यन उदास असून त्याला त्याच्या पत्नीची आठवण येते असे दर्शवण्यात आले होते. त्याचा संदर्भ देऊन भूमी पेडणेकरने “चिंटू त्यागीला आता माझी आठवण येईल. “दिलबरा गाणे आता “पती,पत्नी…’ मध्ये असणार नाही. “असे भूमीने म्हटले आहे. “दिलबरा’ हे गाणे नवी फिरोझपुरवाने लिहीले होते. तर सचेत टंडन आणि परंपरा ठाकूरने त्याला संगीत दिले होते. आपले वैवाहिक आयुष्य आणि बाहेरच्या मैत्रिणीबरोबरचा समतोल साधण्याचा प्रयत्न चिंटू त्यागी अर्थात कार्तिक आर्यन करताना या सिनेमात दिसणार आहे. सिनेमा 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.