ब्राझील – ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारतीय गोल्फर दिक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या ऍशलिन ग्रेसचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे.
विशेष म्हणजे दिक्षाने याआधी टर्कीतील 2017 सालच्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्यपदक मिळवल्याने दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती पहिली भारतीय गोल्फर ठरली आहे.
दीक्षाने गोल्फ खेळात आजवर उत्तम कामगिरी केली आहे. 21 वर्षीय डावखुऱ्या दिक्षाने अनेक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धांमध्ये महिला गटात अप्रतिम कामगिरी केली आहे.
अनेक युरोपियन देशात तिने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये दिक्षाने टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली आणि डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही खेळांमध्ये खेळणारी पहिली गोल्फर बनली आहे.