नवी दिल्ली – आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडलेले काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्विजय सिंह यांनी ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना फटकारले आहे. तुम्ही ‘जय सिया राम’ का म्हणत नाहीत नालायकांनो? असा सवालही त्यांनी केला आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, ते भाजपाचे लोक सीताजींचे नाव सोडून श्रीरामाची घोषणा देतात. सीतेशिवाय राम अपूर्ण आहेत. ते (भाजप) फक्त रामाच्या नावावर उद्योग करतात.
#WATCH ये (BJP) श्री राम का नारा भी ऐसे लगाते हैं कि सीता जी का नाम छोड़ देते हैं..जय सिया राम क्यों नहीं बोलते नालायकों? भगवान राम सीता के बिना अधुरे हैं। ये (BJP) केवल राम नाम का व्यापार करते हैं: मध्यप्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस सांसद दिग्विजय सिंह, विदिशा pic.twitter.com/cL1yaYJrXh
— ANI_HindiNews (@AHindinews) August 17, 2022
दिग्विजय सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. याआधी दिग्विजय सिंह म्हणाले होते की, भगवे कपडे घालून बलात्कार होत आहेत, मंदिरात बलात्कार होत आहेत. आमच्या सनातन धर्माची बदनामी करणाऱ्यांना देवही माफ करणार नाही.