मोदींना निवडणुकीच्या प्रचारासाठी बीफ निर्यातकांनी पैसा पुरविला – दिग्विजय सिंह

नवी दिल्ली – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींना गोमांस (बीफ) निर्यातकांनी पैसे पुरविले असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी मोदींवर केला. ते एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते.

दिग्विजय सिंह म्हणाले कि, २०१४ च्या निवडणुकांआधी नरेंद्र मोदी गुलाबी क्रांतीविषयी बोलत होते, त्यांचा इशारा बीफ निर्यातांकडे होता. त्यांनी जे म्हंटले ते हिंदू मित्रांसाठी होते जे बीफ निर्यातक आहेत. त्याच मित्रांनी त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पैसा पुरविला होता. भाजपच्या कार्यकाळात बीफ निर्यात वाढले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कथित गोरक्षकांकडून होणाऱ्या जमावहत्येबद्दल बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू म्हणता, हो मी गोमांस खातो. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना गोमांस हवे आहे. आणि भाजपचेच गोरक्षक मुसलमानांना मारहाण करत आहेत. व मोदी गप्प आहेत. हा कुठला न्याय आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)