दिग्पाल लांजेकर उलगडणार शिवचरित्रातील आणखी एक अध्याय; ‘शेर शिवराज है’ सिनेमाची केली घोषणा

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर दिग्पाल लांजेकरने पुन्हा उचलले शिवधनुष्य

मुंबई –  “फर्जंद”, “फत्तेशिकस्त” या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून “फत्तेशिकस्त” नंतर, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा “शेर शिवराज है” हा चित्रपट लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. याच युद्धनीतीवर “शेर शिवराज है” हा चित्रपट आधारित आहे. दिग्पालने आतापर्यंत आपल्या चित्रपटांमधून शिवाजी महाराजांची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

शिवराज अष्टक ही आठ चित्रपटांची मालिका दिग्पाल सादर  करत आहे. यातील ‘शेर शिवराज है’ हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच कारणामुळे दिग्पाल सध्या या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. आठ चित्रपटांपैकी ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांचे दिग्पाल आणि त्याच्या टीमने उत्तम सादरीकरण केले असून, ‘जंगजौहर’ हा तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.