पुणे – डिजीटल पद्धती सोप्या बनवा जेणेकरून समाजातील तळागाळातील लोकांना सुद्धा ऊर्जेचा वापर कार्यक्षरित्या करता येईल. त्यामुळे या क्षेत्रात परस्पर पूरक नवीन मार्ग निर्माण होतील असे केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुणे येथील बीपीच्या जागतीक उद्योग सर्व्हिस सेंटरला भेट दिली. भेटी दरम्यान मंत्र्यांनी सेंटरमधील कर्मचाऱ्याशी चर्चा केली.
बीपी इंडिया पुणे सेंटरच्या उपाध्यक्ष वर्षा सिंग म्हणाल्या, या केंद्रात डिजिटल जी कौशल्ये आहेत ती जागतिक स्तरावर बीपीसाठी जटिल व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भारतातील केंद्र अधिक चांगले व्यवसाय परिणाम मिळविण्यासाठी ऍनालिटीक्स अँड डेटा सायंस क्षमतांसह आपले कार्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
पुण्यातील बीपीच्या सेंटरमध्ये डिजिटल हब देखील आहे. ज्याचे उद्दिष्ट उदयोन्मुख लोकांना समर्थन देण्यासाठी डिजिटल सोल्यूशन्स, व्यवसाय मॉडेल यांची श्रेणी तयार करणे आहे.
केंद्राला प्रतिष्ठित एलईईडी (लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंट डिझाईन) सुवर्ण प्रमाणन प्रदान करण्यात आले आहे, जे बीपीच्या शाश्वततेच्या वचनबद्धतेसाठी आहे. ज्यात पाणी आणि ऊर्जा संवर्धनापासून ते शाश्वत साहित्य आणि संसाधने वापरण्यापर्यंत समावेश आहे.