2019 च्या अखेरीस देशात डिजिटल सेवा वाढल्या

नवी दिल्ली : वर्ष 2019 च्या अखेरीस देशात विविध क्षेत्रातील डिजिटल सेवांमध्ये मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने नोंदवले आहे. किराणा दुकान क्षेत्रातल्या डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारतात सुमारे 1 कोटी 20 लाख किराणा दुकानं आहेत. या क्षेत्राला सेवा देण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात स्टार्ट अप सुरू होत आहेत.

खातेवहीचं डिजिटायझेशन करणे आणि पुरवठा साखळीत सुधारणा करणे या सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. किराणा दुकानांवर लक्ष केंद्रित करून सुरू करण्यात आलेल्या स्टार्ट अप कंपन्यांनी 2019 मध्ये 26 कोटी डॉलरहून अधिक निधी उभा केला. 2018 मध्ये हा निधी 7 कोटी डॉलर एवढा होता. त्यांच्यामध्ये ओकेक्रेडिट, खाताबुक आणि इलॅस्टिक्रून यांचा समावेश होता.

उडान या अधिक व्यापक परिसरात काम करणाऱ्या कंपनीनं मोठ्या प्रमाणात निधी उभा केला. मॅट्रिक्‍स आणि ओलाच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या ज्ञवोगोक्षशी त्यांनी जोरदार स्पर्धा केली. ज्ञबाऊन्सक्षचे सीईओ विवेकानंद यांनी ऑक्‍टोबरमध्येच ट्‌वीट करून स्पष्ट केलं होतं की बंगळुरूमध्ये त्यांच्या गाड्यांनी रोज एक लाख प्रवासी फेऱ्या पूर्ण करण्यास सुरुवात केली होती.

त्यांनी सेवा अधिक कार्यक्षम केल्यानंतर 13 महिन्यांमध्येच ही प्रगती झाली होती. बाईक टॅक्‍सीच्या क्षेत्रातल्या रॅपिडो या कंपनीनं सध्या मासिक 50 लाख प्रवासी फेऱ्यांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2019 च्या मेमध्ये ती 22 लाख प्रवासी फेऱ्या पार पाडणारी कंपनी होती.

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल कॉमर्सच्या क्षेत्रातही नवीन कंपन्या उदयास आल्या आहेत. बुलबुल, सिमसिम, डिलशेअर आणि मॉल या कंपन्या यात आघाडीवर आहेत. मीशो या सोशल कॉमर्स व्यासपीठानं यासाठी पुनर्विक्रेत्यांच्या जाळ्याचा वापर करून घेतला आहे. 2019 मध्ये उच्च वाढीच्या स्टार्ट अपबरोबर काम करणाऱ्या ज्या चेन उद्योजकांनी आणि अधिकाऱ्यांनी अधिक सुलभतेनं भांडवलाची उभारणी केली.

काही वेळा तर व्यवसायाचा आराखडा नसतानाही ते भांडवल उभारणीत यशस्वी ठरले. यात ज्ञसिट्रस पेक्षचे सहसंस्थापक जितेंद्र गुप्ता यांचा समावेश होतो. ते ज्युपिटर ही डिजिटल बॅंकिंग फर्म सुरू करत आहेत. पेटीएम आणि टोकोपीडियाचे माजी अधिकारी अमित लखोटा हे कार पार्किंगच्या व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसायाची उभारणी करत आहेत. निपुण मेहरा हे पाईन लॅब्ज आणि फ्लिपकार्टचे माजी अधिकारी आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.