पुणे – भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 2020 च्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळत आपल्या फलंदाजीने आपला परिचय करून दिला. 23 वर्षीय पिंपरी चिंचवड येथील जुनी सांगवीकर खेळाडूने चेन्नई संघाला अखेरच्या तीन सामन्यात सलग विजय मिळवून देण्यासाठी मोलाचा वाटा उचलला.
या कामगिरी बद्दल जगभरातील नामवंत क्रिकेटपटूंनी ऋतुराजच्या खेळीचे कौतुक केले. त्याच्या याच यशाबद्दल त्याच्या आई वडिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न डिजिटल प्रभातच्या वतीने घेतलेल्या मुलाखतीत करण्यात आला.