टोंगा देशात पसरला डिजीटल काळोख ; इंटरनेट सेवा ठप्प

हॉंगकॉंग: टोंगा देशात गेले काही दिवस डिजीटल काळोख पसरला आहे, तेथील इंटरनेट सेवा झाली ठप्प झाली आहे. गेले 11 दिवस टोंगामधील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. आणि त्याचा परिणाम तेथील सुमारे एक लाख लोकसंख्येवर झाला आहे. इंटनेटच बंद असल्यामुळे लोकांचे व्यवहार अडकून पडले आहेत. ना इंटरनॅशनल कॉल येतात जातात, ना क्रेडिट कार्डचा वापर करता येतो. स्थानिक सेटेलाईट इंटरनेट प्रोव्हायडरमुळे काही व्यवहार चालू आहेत, पण एकूणच सर्वांची पंचाईत होऊन बसली आहे.

टोंगा हा देश न्यूझीलंडच्या उत्तरपूर्वेस सुमारे 1100 मैल अंतरावर आहे. तेथे इंटरनेट सेवा पुरवणारी ऑप्टिकल फायबर 20 जानेवारी रोजी खराब झाली. ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता राष्ट्रीय इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, टोंगा कम्युनिकेशन्स कॉर्पोरेशनच्या मुख्यालयासमोर पूर्वी रेशन दुकानावर लागायच्या तशा लांबच लांब लायनी लागलेल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2013 मध्ये सुमारे तीन कोटी डॉलर्स (210 कोटी रुपये) खर्च करून समुद्रातून ऑप्टिक केबल टाकण्यात आली होती. एशियन डेव्हलपमेंट बॅंक, वर्ल्ड बॅंक आणि टोंगा केबल लिमिटेड ने त्यासाठी अर्थ पुरवठा केला होता. एखाद्या जहाजामुळे समुद्री केबल खराब झाली असावी असा अंदाज केला जात आहे. आणखी काही दिवसात इंटरनेट सेवा परत सुरू होण्याची शक्‍यता आहे. इंटरनेट सेवा बंद होते, तेव्हा तिचे महत्त्व अधिकच जाणवते हे खरे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)