गुंतवणूकदारांना शेअर विकतांना आल्या अडचणी

मुंबई – झिरोदासह अनेक ब्राकरेज संस्थाना शेअर विक्रीवेळी सोमवारी सकाळी काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हीसेसच्या काही सेवावर काही काळ परिणाम झाल्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

दुपारनंतर मात्र सर्व अडथळे दूर करण्याता आले आणि पुर्ण कामकाज नियमीत झाले असल्याचे सांगण्यात आले. सकाळी काम सुरू झाल्यबरोबर काही गुंतवणूकदारांना अडचणी आल्यानंतर या गुंतवणकूदारांनी ट्‌विटरवर असमाधन व्यक्त केले. त्यानंतर झेरोदा आणि पेटीएम यांनीही आपल्या गुंतवणकूदारांना याबाबत अवगत केले. नंतर हा प्रश्‍न सुटल्यानंतर दुपारी याबाबात गंतवणकूदारांना आणि ब्रोकर्सना काम सुरळीत चालू असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.