कोरोना डेटा गोळा करणार्‍या सरकारी संस्थांच्या आकडेवारीत फरक 

नवी दिल्ली: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल कोऑपरेटिव डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनसीडीसी) देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची एकूण संख्या आणि मृत्यूची आकडेवारी गोळा करीत आहेत, परंतु दोन्ही संस्थांनी दिलेल्या आकडेवारीमध्ये फरक आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली  राज्य आरोग्य सचिवांशी रविवारी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बैठकीत दोन्ही संस्थांनी एकत्रित केलेल्या डेटामधील मतभेदांवर चर्चा करण्यात आली.

तसेच बैठकीत केलेल्या सादरीकरणात एनसीडीसी आणि आयसीएमआरने एकत्रित केलेली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत फरक दिसून आला. एनसीडीसीने 26 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत देशात कोरोनाचे एकूण 26,496 प्रकरणांची पुष्टी केली आहे, तर आयसीएमआरने ही संख्या 27,583 असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे, दोन्ही संस्थांनी प्रदान केलेल्या डेटामध्ये 1,087 रुग्णांचा फरक आहे. यावेळी असे दिसून आले की, एनसीडीसी आणि आयसीएमआरचा डेटा फक्त आठ विभागामध्ये समान आहे, ज्यात ईशान्य भारताच्या पाच राज्यांचा आणि दादर, नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप अशा केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

या आठ विभागापैकी चार ठिकाणी कोरोनाची प्रकरणे नाहीत.  तर केवळ एका राज्यात कोरोनाचे दोन पेक्षा प्रकरणे असून, मेघालयात 12 प्रकरणे आहेत. देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनसीडीसीच्या नोंदींपेक्षा आयसीएमआरच्या नोंदींमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे आहेत. यात सर्वाधिक फरक महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनाचे 8 हजार 488 प्रकरणे असून गुजरातमध्ये 3 हजार 809 तर, गुजरातमध्ये 770 प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर एनसीडीसीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 7 हजार 628, गुजरातमध्ये 3 हजार 71 तर पश्चिम बंगालमध्ये  611 प्रकरणे नोंदवल्या गेली आहेत. देशातील या 21 राज्यांमधील सर्वात मोठा फरक महाराष्ट्रात आहे, जेथे दोन्ही संस्थांच्या आकडेवारीत 1 हजार 220 रुग्णांचा फरक आहे. नागालँडमध्ये फक्त एक रुग्णाचा फरक आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार नागालँडमध्ये कोरोनाचा एकच रुग्ण आहे, तर एनसीडीसीमध्ये ही संख्या शून्य आहे. देशात अशी आठ राज्ये आहेत जिथे एनसीडीसीची आकडेवारी आयसीएमआरपेक्षा जास्त आहे. सर्वात मोठा फरक दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आहे. एनसीडीसीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत कोरोनाचे  2 हजार 625 रुग्ण आहेत तर आयसीएमआरच्या आकडेवारीत ही संख्या फक्त 2 हजार 155 आहे. एनसीडीसीच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात एकूण कोरोनाचे  2 हजार 96 तर आयसीएमआरनुसार  1 हजार 778 रुग्णांचा फरक  आहे. एनसीडीसीच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांची संख्या 1 हजार 793 आहे आणि आयसीएमआरनुसार 1 हजार 572 रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.