आहारतज्ज्ञ म्हणतात,’पिस्ता रात्री खाऊ नये कारण…’

मिठाईच्या दुकानात मिठाई वर हिरव्या रंगाचे नाजूक काप आपल्याला दिसतात. ते काही नसून ‘पिस्ता’च. पिस्ता बाहेरून टणक आणि आत हिरवा पिस्ता.. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी3, प्रोटीन, अँटीऑक्‍सिडंट, पोटॅशियम, कॉपर, झिंक, थायमिन असतात.

1.कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म पिस्त्या मध्ये आहे. पिस्ता खाल्याने शरीराला नको असलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. 2.पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन इ असते. ज्याने त्वचा तजेलदार राहते.
3.पिस्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 6 हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
4.पिस्ता खाल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांना होणाऱ्या विकारापासून पिस्ता दूर ठेवतात.
5.चेहऱ्यावरचे सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यांत फायदेशीर ठरतो.

6.पिस्ता खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते तसेच ब्लड प्रेशर, पिस्त्या अंगावरील सूज कमी करते.
7.पिस्त्या मध्ये फायबर व प्रोटीन हे दोन्ही असतात ज्यानं पोट भरल्या सारखे वाटते व पिस्त्या वजन कमी करण्यास मदत करते.
8.पिस्ता अतिप्रमाणात खाल्ल्‌याने शरीरातील फॅट वाढू शकते. या शिवाय पिस्ता रात्री खाऊ नये कारण तो पचण्यास जड जातो.

डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.