मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत अनेकदा तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने जावेद अख्तर यांच्यापाकिस्तानातील वक्तव्यावर टिप्पणी केली होती, आता पुन्हा एकदा कंगना तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाने अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे.
कंगना अनेकदा बड्या स्टार्ससोबत पंगा घेते.ज्यामध्ये ती वारंवार करण जोहरला टोमणे मारत असते. यावेळी तिने पुन्हा करणवरची खिल्ली उडवली आहे. कंगनाने ‘सेल्फी’ चित्रपटाचे पोस्टर ट्विटद्वारे शेअर केले आणि चित्रपट फ्लॉप ठरल्याचे म्हंटले आहे. करण जोहरने सेल्फी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
खरंतर अक्षय कुमारच्या या चित्रपटाची तुलना कंगनाच्या ‘धाकड’शी केली जात होती, जो फ्लॉप ठरला होता. सोशल मीडियावर अनेकजण अक्षयच्या ‘सेल्फी’ला ‘धाकड’चे मेल व्हर्जन म्हणत होते त्यामुळेच कंगनाने ट्विट करत करणचा चांगला समाचार घेतला आहे.
कंगनाने अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले की,”‘करण जोहरच्या चित्रपटाने 10 लाख रुपयेही कमावले नाहीत, पण मीडियाचे लोक त्याचे नाव किंवा त्याच्या कंपनीचे नाव घेत नाहीत. ज्या चित्रपटाशी माझा काहीही संबंध नाही तो चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण मी असल्याचं बोललं जात आहे. व्वा भाई करण जोहर व्वा” असं म्हणत एक प्रकारे कंगनाने करणची खिल्ली उडवली आहे.
Meanwhile Karan Johar ki film ne 10 lakh bhi nahi kamaye, lekin media wale na uska naam use kar rahe hain na uske production ka naam, jiss film se mera koi lena dena nahi uska flop hone ka reason bhi mujhe bataya ja raha hai
Wah bhai Karan Johar wah !! 😂 https://t.co/e4wcBaydBC— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 24, 2023
अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ तीन कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही आणि रिलीजच्या पहिल्याच दिवशी तो फ्लॉप ठरला असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत इमरान हाश्मी, नुसरत भरुचा आणि राहुल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.