अक्षयचा #BottleCapChallenge पूर्ण करतानाचा व्हिडिओ पाहिला का?

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये चॅलेंजेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मध्यंतरी आलेले आईस बकेट चॅलेंज असोत की फ्लिप द बॉटल चॅलेंज असो अशा सर्वांनाच नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दिसतात. असे चॅलेंज स्वीकारून ते पार पाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्याची प्रथा बॉलीवूडकरांमध्ये देखील सुरू झाली असून यामध्ये अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, वरून धवन असे बॉलीवूड सुपरस्टार्स आघाडीवर असल्याचे दिसून येते.

अशातच आता सोशल मीडियावर एक नव्या प्रकारचे चॅलेंज आले असून या चॅलेंजचे नामकरण #BottleCapChallenge असं करण्यात आलं आहे. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने नुकतच हे चॅलेंज स्वीकारले असून ते पूर्ण करतानाचा व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर खात्यावर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार समोर ठेवलेल्या बॉटलचे झाकण किक मारून उडवताना दिसत आहे. या पोस्ट बरोबर लिहिलेल्या संदेशांमध्ये अक्षय कुमारने आपण सदर चॅलेंज आपला ॲक्शन आयडॉल जेसन स्टेथम याच्यापासून इन्स्पायर होऊन पूर्ण करत असल्याचं सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.