नवी दिल्ली – यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याकडे अख्या जगाचे लक्ष लागले आहे. क्रिकेटच्या या फिव्हरमध्ये भारतीय संघाचे एका सुरातील गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे सर्व खेळाडू उत्साहाने आणि जोशमध्ये एकसाथ ‘सुनो गोर से दुनियवालो’ गाताना दिसत आहे. या व्हिडिओला हॉकी इंडियाच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Humne kaha hai jo, tum bhi kaho! ????#IndiaKaGame #FIHSeriesFinals #RoadToTokyo @IndiaSports @Media_SAI @CMO_Odisha @sports_odisha @FIH_Hockey pic.twitter.com/fgeNn34iZ4
— Hockey India (@TheHockeyIndia) June 23, 2019
दरम्यान, भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवित आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या एफआयएच करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी जपानचा ३-१ असा पराभव केला. भारत व जपान हे दोन्ही संघ यंदा आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
AND THEY GET ONE STEP CLOSER…
Congratulations to the Indian Women’s Team on comprehensively winning the FIH Women’s Series Finals Hiroshima 2019 and thereby qualifying for the Olympic qualifiers! ????#IndiaKaGame #FIHSeriesFinals #RoadToTokyo #INDvJPN pic.twitter.com/40FLOF9hkI
— Hockey India (@TheHockeyIndia) June 23, 2019