मुंबई – सेलेब्रिटी कीड तैमूरने गणपती बाप्पाला आपल्या घरी विराजमान केलं आहे. गणपती बाप्पाची अर्चना करत असलेल्या तैमूरचा फोटो त्याची आई व नावाजलेली अभिनेत्री करीना कपूर हिने इन्स्ट्राग्रामवर टाकला आहे. या फोटोमध्ये तैमूर ब्लॉक बिल्डिंग टॉयद्वारे साकारलेल्या बाप्पासमोर हात जोडून बसल्याचं पाहायला मिळतंय.
करिनाने या फोटोसोबतच, “यंदाचा गणेशोस्तव दरवर्षीपेक्षा वेगळा असणार आहे. मात्र टीमने (तैमूरने) लिगोचे बाप्पा साकारत आमचा गणेशोस्तव आनंददायी ठरेल याची खबरदारी घेतली. सर्वांना हा गणेशोस्तव आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना.” असा संदेशही दिला आहे.
“Ganpati celebrations might be a little different this year… But Tim made sure the festival was on point by making a beautiful lego Ganeshji for us ❤️💯. Wishing you all a very happy Ganesh Chaturthi. Praying for peace, everyone’s health and safety.” – Kareena Kapoor Khan pic.twitter.com/4IMzSKRr0f
— Kareena Kapoor Khan (@KareenaK_FC) August 22, 2020
यंदा कोरोना संकटामुळे प्रथमच अनेक अटीशर्तींसह गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ भक्तांवर आली आहे. मात्र असं असलं तरी गणेशभक्तांच्या उत्साहात तीळभरही कमतरता दिसून आली नाही. शासनातर्फे घालून देण्यात आलेली सर्व बंधने पाळून गणेशभक्तांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या आहेत.
यात बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मागे राहिले नसून त्यांनीही लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत केलं आहे. गणपती बाप्पा मोरया… म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, बाप्पापुढे हात जोडून बसलेल्या तैमूरचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक करण्यात येतोय.