मुंबई – आषाढी एकादशी निमीत्ताने मराठी अभिनेता ‘जितेंद्र जोशी’ने आपल्या इंस्टाग्राम आकाउंटर एक फोटो शेअर केला असून, त्याखाली जितेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच त्याने आपले अन्य काही विचार देखील मांडले आहेत.
“आज आषाढी एकादशी म्हटलं तुकोबाची भूमिका केलेला एखादा फ़ोटो देऊ टाकून आणि त्या निमित्ताने पुन्हा लोकांना आठवण करून देऊया आपल्यात असलेल्या विविधांगी/ चतुरस्र वगैरे की काय असतो त्या अभिनेत्याची. किंवा एखादा अभंग टाकुया किंवा आपण वारीला जात असल्याचा एखादा सेल्फी? डोक्यावर तुळस वगैरे? पण मग…”